"ग्रंथमित्र" हि केंद्रीय ग्रंथालय माहिती प्रणाली आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक वाचनालयांसाठी अकौंटच्या सर्व सेवा आज्ञावलीद्वारे पुरवल्या आहेत.
वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहेत.
"ग्रंथमित्र" आज्ञावलीद्वारे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाचनालय अकौंटचे व वार्षिक अहवालचे काम करू शकते. आज्ञावलीमध्ये फक्त व्हावचर नोंद करणे आवश्यक आहे. यावरून कीर्द, खतावणी, जमा-खर्च तयार होते. त्यामळे लिखाण काम वाचते. आज्ञावलीमध्ये तयार होणारी पत्रके छपाई करावी व बांधणी करावी.
तसेच वार्षिक अहवाल आज्ञावलीमध्ये तयार करता येतो व सर्व वार्षिक अहवाल माहिती ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध केली जाऊ शकते.
"ग्रंथमित्र" द्वारे पुरविल्या जाणा-या वैशिष्टपूर्ण सेवा
१. व्हावचर
२. कीर्द
३. खतावणी
४. जमा-खर्च
वर्गवारी प्रमाणे आवश्यक सर्व वार्षिक अहवालची माहिती नोंद करणे व छापील प्रत मिळविणे. आज्ञावलीद्वारे संग्रह केलेली माहिती थेट ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठविली जाऊ शकते.
महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक वाचनालये आज्ञावलीद्वारे ग्रंथालय अधिकारी कार्यालयांशी जोडणे शक्य आहे. ग्रंथालय अधिकारी आज्ञावलीद्वारे सर्व वाचनालयांचे लेखा तपासणी करू शकतात.
Copyright © Technotime Computer Systems